सणसवाडीत डोंगराला भीषण आग

कांदा आरण आणि ऊस जळून खाक : तीन किलोमीटर परिसरात पसरली आग

सणसवाडी – सणसवाडी, पिंपळे जगताप आणि वढू बुद्रुक शिवेवर सणसवाडी हद्दीमधील तीन किलोमीटर परिसर असलेल्या डोंगर रांगेस शुक्रवारी (दि.13) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात डोंगर परिसराच्या बाजूस असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडे, दोन एकर ऊस आणि एक कांद्याची आरण जळून खाक झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्याची भरपाई संबंधित विभागाकडून मिळावी, अशी मागणी होत आहे.

शुक्रवारी (दि.13) दुपारी पिंपळे जगताप येथील भारत गॅस कंपनीच्या मागील डोंगर असलेल्या भागास आग लागली. यावेळी कंपनीतील सुरक्षा विभागाने आग आटोक्‍यात आणली. परंतु तसेच पुढं सणसवाडी हद्दीतील डोंगराने आग पकडली. यातच वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरली. यावेळी एका कंपनीच्या साहित्याला लागलेली आग रांजणगाव एमआडीसीमधील अग्निशामक दलाने आग आटोक्‍यात आणली. मात्र, ही आग आटोक्‍यात आणताना ती डोंगराच्या दिशेने शेताकडे पसरली. यावेळी शिवराज वॉटर सप्लायर्स यांनी एक टॅंकर उपलब्ध केला. परंतु आगीच्या वेगात परशुराम नाना दरेकर यांचा एक एकर ऊस तर हनुमंत सोपान दरेकर यांचा 100 गोणी भरेल एवढा कांदा जाळून खाक झाला. यावेळी वनविभागाचे वनरक्षक सोनल राठोड आणि सहायक आनंदा हरगुडे यांनी नागरिकांना मदतीस बोलावून आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मोहन यशवंत दरेकर, हनुमंत दरेकर, हिरामण बबन दरेकर, सौरभ दरेकर, विजय दरेकर, हिरामण सोपान दरेकर, विजय दरेकर आणि गणेश दरेकर यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. हरगुडे यांनी काही शेतकऱ्यांकडून पोती भिजवून आणली. परंतु आग मोठी असल्याने मोजक्‍या लोकांना आग आटोक्‍यात आणता आली नाही. घटनास्थळी समक्ष पाहणी केली असता याबाबत वनविभागाकडे संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, यापूर्वी जाळ पट्टे न काढल्याने आग वाढत गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच डोंगर भागालगत लोकवस्ती वाढत असल्याने भविष्य काळात योग्य उपाययोजना वन विभागाने कराव्यात, असे मोहन दरेकर यांनी सांगितले. सायंकाळी 7 पर्यंत जळीत ऊस आणि कांदा याचा पंचनामा कृषी विभागाकडून पंचनामा झाला नव्हता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)