सणसवाडीत घरातून सोन्याचे दागिने व पर्स चोरी

शिक्रापूर-सणसवाडी (ता. शिरूर) येथील काळुबाई मंदिराजवळील एका घरातील सर्वजण लाईट नसल्यामुळे घराच्या टेरेसवर झोपले असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व पर्स लांबविली असल्याची घटना बुधवारी घडली.
याबाबत निर्मला अंतराम गडेराव (रा. सणसवाडी, ता. शिरूर; मूळ रा. साई आरण्यखेडा ता. जि. लातूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मला गडेराव व त्याच्या घरातील हे बुधवारी रात्री लाईट नसल्यामुळे जास्त गरम होत असल्यामुळे सर्वजण घराला कुलूप लावून घराच्या टेरेसवर झोपायला गेले होते. त्यानंतर कोणीतरी घराच्या दरवाजाची कडी तोडून आतमध्ये प्रवेश करत सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण, सोन्याचे कानातील फुले तसेच कागदपत्रे, एटीएम ठेवलेली पर्स असा अंदाजे 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना घडली. सकाळी सर्वजण उठल्यानंतर वरील प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार घडल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. पुढील पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)