सणसवाडीत ग्रामस्थांनी लुटला वनभोजनाचा आनंद

सणसवाडी- येथे श्रावण मासनिमित्त गेली अनेक वर्ष खंडीत झालेली वनभोजन प्रथा नव्याने सुरु करण्यात आली. सणसवाडी येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरापासून नरेश्वरमहाराज मंदिरपर्यंत टाळ, मृदुंग, ज्ञानबा, तुकाराम आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत पालखी सोहळा पार पडला. यात भाविक, भक्तांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला होता. यावेळी श्रींना जलाभिषेक करण्यात आला. नरेश्वर मंदिर टेकडी परिसरात देशी पद्धतीची वाढलेल्या वनराईत पालखी विसावली. यावेळी ग्रामस्थांनी घरून आणलेली पुरण पोळी, झुणका-भाकरी, पुरीभाजी आणि गोड पदार्थांची मेजवानी एकत्र करून वनभोजनाचा आनंद लुटला. यावेळी ग्रामस्थांनी बोलतांना सांगितले की, वनभोजनाच्या निमित्ताने गावातील विचारांची देवाण-घेवाण तसेच गावातील कौटुंबिक स्नेह वाढावा. पर्यावरणाला हातभार लावून मंदिर टेकडी परिसरातील वनराई विकसित करण्याच्या दृष्टीने वैज्ञनिक दृष्टीकोन वाढवणास मदत होणार आहे. यावेळी शोल्क म्हणत वनभोजन पार पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)