सणसवाडीत कामगाराचा खून करणाऱ्याला 48 तासात जेरबंद

शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा कंपनीतील सुपरवायझरने चाकूने भोकसून खून केला होता. खून केल्यानंतर आरोपी सुपरवायझर संतोष शहाजी राठोड (रा. येडशी, ता. जि. उस्मानाबाद) फरार झाला होता. त्याला अठ्ठेचाळीस तासात शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. राठोड हा हैद्राबाद किंवा आंध्रप्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे त्याला अटक केल्यानंतर त्याने सांगितले.
सणसवाडीत येथे मुलीच्या प्रेम प्रकरणातून दामोदर कृष्णा जबल (वय 40 वर्षे रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ राहणार धारावी मुंबई) या कामगाराचा सुपरवायझर संतोष राठोड याने प्रेमप्रकरणातून झालेल्या भांडणाच्या कारणातून चिडून जाऊन 20 ऑगस्ट रोजी सणसवाडी येथील संचेती कंपनीसमोर दामोदर जबल याचा चाकूने भोकसून खून केला होता. त्यांनतर आरोपी संतोष राठोड हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी शिक्रापूर पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केली होती. त्याचा शोध घेत असताना हा आरोपी उस्मानाबाद येथे असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, पोलीस नाईक अनिल जगताप, योगेश नागरगोजे यांचे पाठक उस्मानाबाद येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊ लागले. त्यावेळी पोलिसांना बुधवारी (दि.22) सकाळी उस्मानाबाद येथील हॉटेल शालीमारच्या मागे आरोपी संतोष राठोड हा आढळला असून पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले आहे. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. संतोषचे एका मुलीवर प्रेम होते. परंतु ज्या मुलीवर प्रेम होते तिच्याबाबत संतोषचा दामोदरवर संशय होता. त्यावरून त्यांचे भांडण झाले होते. परंतु भांडण झाल्यानंतर त्यांचे पुन्हा 20 ऑगस्ट रोजी फोनवर भांडण झाले. त्यांनतर दोघे संचेती कंपनीसमोर आले असताना दामोदरने संतोषला मारण्यासाठी चाकू आणला होता. परंतु झटापटीत तोच चाकू संतोषने दामोदरच्या पोटात खुपसला.त्यामध्ये दामोदरचा खून झाल्याचे संतोष राठोडने सांगितले. तर संतोष राठोड यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अटक करून सायंकाळी आणले. त्याला गुरुवारी शिरूर न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)