सणसवाडीत कंपनीतून चार मशिनरींची चोरी

शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथील अनेक ठिकाणी कंपन्यामध्ये चोऱ्या होत असताना आते येथील एल. अँड टी. फाटा येथील एका कंपनीतून वापरून जुन्या झालेल्या चार मशीन चोरल्याचा प्रकार गुरूवारी (दि.10) रात्रीच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सणसवाडी (ता. शिरूर) येथील एल. अँड टी. फाटा येथील व्हिजन इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये वापरून जुन्या झालेल्या काही मशीन येथील एका खोलीमध्ये ठेवलेल्या होत्या. कंपनीतील कामगार घरी गेलेले असताना गुरूवारी (दि.10) कोणीतरी कंपनीचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केल. तसेच कंपनीमधील ड्रील मशीन, लेंथ मशीन, सीएनसी मशीन तसेच एक डीपी अशा सुमारे 1 लाख 65 हजार रुपये किमतीच्या चार मशीन चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. दुसऱ्या दिवशी हा प्रकार समोर आला. त्यामुळे याबाबत उमाकांत बसवनअप्पा मिरचे (रा. पाटवस्ती, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि.11) शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण हे करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)