सणसवाडीत एसटी चालक, वाहकाला शिवीगाळ

शिक्रापूर -सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे-जालना ही एसटी बस घेऊन जात असताना एका कारला धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी एसटी वाहक व चालकाला रस्त्यात अडवून त्यांच्या ताब्यातील एसटी फोडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
चालक जॉन उर्फ जयेश कमलाकर लोखंडे (रा. रामनगर रोड जालना) व वाहक विनोद खंडागळे अशी शिवीगाळ व दमदाटी झालेल्यांची नावे असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानदेव पंढरीनाथ खेडकर, दीपक शिरसाठ, रोहन आगळे (रा. सणसवाडी, ता. शिरूर) यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जालना एसटी डेपोतील चालक जॉन उर्फ जयेश कमलाकर व वाहक विनोद खंडागळे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (एमएच 20 सीएल 1916) शिवाजीनगर-पुणे येथून प्रवासी घेऊन जालना येथे निघाले असताना येरावडा येथे सिग्नलला त्यांच्यापुढे असलेल्याने त्याच्या ताब्यातील कार (एमएच 12 क्‍यूटी 5570) पुढे घेऊन अचानक मागे घेतल्याने एसटीच्या धक्‍य्याने कारची मागील बाजूची लाईट फुटली. त्यावेळी एसटी चालक व वाहकांनी कारचालकाला जवळील पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी जवळील येरवडा पोलीस ठाण्यात कार चालकाची वाट पाहिली; परंतु कारचालक पोलीस ठाण्यात न आल्याने एसटी चालक व वाहकांनी त्यांची एसटी नगर बाजूने घेतली असताना सणसवाडी येथे दीपक शिरसाठ, रोहन आगळे या दोन युवकांनी त्यांची एसटी अडवून चालक व वाहकांना शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरवात केली. दगड घेऊन एसटीमध्ये घुसून एसटी फोडण्याची धमकी दिली. त्यानंतर लगेचच काही वेळाने पाठीमागून आलेल्या कारवरील चालक ज्ञानदेव खेडकर यांनी देखील चालक लोखंडे व वाहक खंडागळे यांना शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला. एसटी चालकाने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार या तिघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)