सणसवाडीतून मोबाइल चोरणारा शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे नागरिकांचे मोबाइल चोरी जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले असतानाच या परिसरातून मोबाइल चोरी करणाऱ्या एका युवकाला चोरीच्या तीन मोबाइल आणि गुन्ह्यातील दुचाकीसह ताब्यात घेण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील हॉटेल निवांत शेजारी राहणाऱ्या उस्मान यासन अली अन्सार (रा. सणसवाडी, ता. शिरूर जिल्हा पुणे, मूळ रा. चेगोना, ता. छत्तरपूर, झारखंड) या युवकाचा मोबाइल 6 सप्टेंबरला एका अल्पवयीन युवकाने चोरून नेला होता, यावेळी चोरी करताना या युवकाला तेथील काही नागरिकांनी पहिले होते, त्यांनतर उस्मान अन्सार याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन युवकावर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस नाईक विजय गाले यांनी या अल्पवयीन युवकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचे तीन मोबाइल मिळाले. यावेळी या युवकाने अन्य ठिकाणी देखील त्याच्याकडील दुचाकीवरून जाऊन मोबाइल चोरी केली असल्याचे कबूल केले आहे. शिक्रापूर पोलिसांनी या अल्पवयीन युवकाकडून चोरीच्या तीन मोबाइलसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्र. एमएच 12 एनसी 0699 जप्त करत त्यास ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)