सणसवाडीतील अंगणवाडीस आयएसओ नामांकन

सणसवाडी- येथील प्रगती अंगणवाडीस आयएस ओ नामांकन मिळाले असून सणसवाडी उद्योग नगरीतील अंगणवाडीमध्ये अनेक प्रांतातील मुले शिक्षण घेत आहेत. आयएसओ प्राप्तसाठी असणाऱ्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. सोमवारी (दि.16) आंगणवाडीस आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी पंचायत समिती पर्यवेक्षक माणिक देडगे, उपसभापती हरगुडे, सणसवाडी सरपंच रमेश सातपुते, कोव्हीजन फाऊंडेशन ट्रस्ट पदाधिकारी प्रतीक्षा दरेकर, रणजित हंगरगेकर, सारिका पवळे, उपसरपंच राहुल दरेकर, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ भुजबळ, गणेश दरेकर, ग्रामविकास अधिकारी बी. एच. पवणे, सुमित दरवडे, गोरक्ष भुजबळ आदी उपस्थित होते. सरपंच सातपुते रमेश सातपुते आयएसओविषयी माहिती दिली. रंजित हंगेकर यांनी प्रस्तावना केली. तर संतोष हरगुडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)