सणसवाडीचे 25 विद्यार्थी गुणवता यादीत

सणसवाडी- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी येथील 25 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये – अंकिता शेडगे, आचल पहिलवान, पायल दरेकर, रोहन घायतडकर, सानिया साळुंके, शंकर नहीराळे, श्रावणी दरेकर आणि 8 वीमधील श्‍वेता कोनाळे, प्रतीक चोपडे, प्रतीक माने, गणेश टरके, प्रियंका हिरे, प्रांजली वांढेकर, अमृता पवार, निखिल विजय वर्गीय, भूषण गोसावी, रोहन बारहाते, यश रोकडे, देविदास दरेकर, अविष्कार दरेकर, दिपराज हरगुडे, साक्षी बुरे, रितेश शिंदे, हृतिक जरे, अंजली गचे आदी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. त्यांना ए. एस. अडसूळ, जयश्री शेळके, बी. पी. चव्हाण, कैलास पुंडे, के. ए. रणसिंग, एस. जी. गभाले आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, मुख्याध्यापक बी. डी. गोरे, सचिव निवृत्ती दरेकर, पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते, उपसरपंच सुनीता दरेकर आणि ग्रामपंचायत सदस्य व शाळेच्या संचालक मंडळाने अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)