सणसरमध्य कॅन्सर साक्षर, मुक्‍त अभियान

भवानीनगर- रुग्णांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा असल्याने स्व. आर.आर.पाटील कॅन्सर साक्षर व कॅन्सरमुक्त अभियान 2018-19 अंतर्गत मोफत शिबिरास सणसर (ता. इंदापूर) येथून इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
जिल्हा परिषद पुणे, सार्वजनिक आरोग्य विभाग, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल, आस्था ब्रेस्ट कॅन्सर हॉस्पिटल, रोटरी क्‍लब हडपसर सेन्ट्रल, डी. वाय.पाटील मेडिकल कॉलेज, डॉ. बाळासाहेब राऊत हॉस्पिटल इंदापूर, मासूम संस्था पुणे यांच्या संयुक्‍त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, इंदापूर पंचायत समिती सदस्या इंदापूर शीतल वणवे, सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, सागर भोईटे, श्रीनिवास कदम, वसंत जगताप, राहुल काळे, पार्थ निंबाळकर, अमोल भोईटे, कामिनी चव्हाण, यशवंत नरुटे, दादा कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, इंदापूर तालुका पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.
यावेळी दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यामध्ये आशा प्रकारचे कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे पहिल्या स्टेजमध्ये निदान करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये आशा प्रकारचे शिबीर आयोजित करणारी पहिलीच पुणे जिल्हा परिषद आहे. ग्रामीण भागामध्ये मोफत कॅन्सर तपासणी शिबीर ही फार मोठी उपलब्धी आहे. कॅन्सरचे पहिल्या अवस्थेत रोगनिदान हे रुग्णाला जीवदान ठरू शकते. ग्रामीण भागात तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे कॅन्सरबाबत जनजागृती होणे ही काळजी गरज आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात पालेभाज्यावर ही मोठ्या प्रमाणात औषधांचा मारा असल्याने असे आजार होण्याचे कारण होत आहे. त्यामुळे भाज्या कोमट पाण्यात धुवून शिजविल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)