सणसरच्या सरपंच, उपसरपंचांवरील अविश्‍वास मंजूर

भवानीनगर- सणसर (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाच्या विरोधात 13 विरुद्ध शुन्य मतांनी अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला.
सणसर ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या काळे व उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या सतरा पैकी 13 सदस्यांनी तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता.या अविश्वास ठरावावर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांचे मतदान घेतले. यावेळी ग्रामपंचायतीच्या 13 सदस्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या विरोधात मतदान केल्याने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासाठी सरपंच उपसरपंच व दोन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहीले नाहीत, त्यामुळे 13 सदस्यांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्या 13 सदस्यांनीच अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले.सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात घेत नाहीत. सरपंच गावच्या विकासाची कामे करित नाहीत आदी कारणांवरुन सदस्यांनी हा ठराव दाखल केला होता.
ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेल्या अविश्‍वास ठरावाच्याबाबत सरपंच संध्या काळे व उपसरपंच अभयसिंह निंबाळकर म्हणाले की, सणसर मधील भाजपच्याच नेत्यांनी भाजपच्या सरपंच उपसरपंचावर अविश्‍वास आणला आहे. या ठरावाची नोटीस आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही चार सदस्य उपस्थित राहीलो नाही. या ठरावाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी तक्रार दाखल करणार आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)