सणसरच्या आझाद मंडळास गणराज पुरस्कार प्रदान

भवानीनगर- सणसर (ता.इंदापूर) येथील आझाद तरुण मंडळास श्री गणेशोत्सव 2017 चा गणराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजामध्ये जातीय सलोखा शांतता एकात्मता व बंधुभाव निर्माण व्हावा या संकल्पनेतून वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने 2017 मध्ये “बेस्ट गणराज आवार्ड’ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वालचंदनगर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाने यात सहभाग घेतला होता. यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविणारे सणसर आझाद तरुण मंडळास 2017 चा गणराज आवार्ड पुरस्कार नुकताच वालचंदनगर येथे बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मंडळाच्या वतीने मिथुन बारवकर, स्वप्निल शिंदे, प्रकाश शिंदे, राहुल जगताप, अजिंक्‍य शिंदे, गणेश जाधव आदींनी स्विकारला. याप्रसंगी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अरविंद काटे, संजयकुमार धोत्रे, गणेश काटकर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)