सणवारांमुळे मासळी बाजारावर मंदीची छाया

संग्रहित छायाचित्र

मासळीच्या भावात घसरण : मटण, चिकण स्थिर

पुणे – शनिवार, रामनवमी आणि मंगळवारी असलेली एकादशीमुळे मासळीला मागणी घटली आहे. त्यामुळे खाडी, खोल समुद्रातील मासळीच्या भावात सुमारे 5 ते 10 टक्‍के, तर नदीतील मासळीच्या भावात सुमारे 20 टक्‍के घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकणचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. तर उन्हाळ्यामुळे अंड्याला मागणी घटली आहे. त्यामुळे इंग्लिश अंद्याच्या भावात शेकड्यामागे 30 रुपयांनी घट झाली आहे. तर गावरान अंड्याचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी गणेश पेठ येथील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीचे 7 ते 8 टन, खाडीच्या मासळीची सुमारे दोनशे ते अडीशे किलो, नदीच्या मासळीची सुमारे पाचशे ते सहाशे किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे 8 ते 9 टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. खोल समुद्रातील मासळी (घाऊक बाजारातील प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : 1300, मोठे : 1100-1200, मध्यम : 900-1000, लहान :700- 800, भिला : 500-600, हलवा : 480, सुरमई : 400-600, रावस-लहान :550, मोठा : 750, घोळ : 550, करली : 240-360, करंदी : 230 भिंग : 280, पाला : 550-1100, वाम : पिवळी 240 काळी 550, ओले बोंबील : 120-240. कोळंबी ः लहान : 280, मोठी : 480, जंबोप्रॉन्स :1300, ,किंगप्रॉन्स : 750, लॉबस्टर : 1300, मोरी : 180-280, मांदेली : 120, राणीमासा : 160-200, खेकडे : 200, चिंबोऱ्या : 480, खाडीची मासळी : सौंदाळे : 240, खापी : 240, नगली : 320, तांबोशी : 480, पालू : 200, लेपा : 140-200, शेवटे : 180, बांगडा : लहान : 120, मोठे : 180 -200, पेडवी : 50, बेळुंजी : 100-140, तिसऱ्या : 180 खुबे : 160, तारली : 120. नदीची मासळी : रहू : 160, कतला : 180-200, मरळ : 400, शिवडा : 160चिलापी :50, मागुर : 130, खवली : 150, आम्ळी : 80 खेकडे : 160, वाम : 500 मटण : बोकडाचे : 460, बोल्हाईचे : 460, खिमा : 460, कलेजी : 480. चिकन : चिकन : 130, लेगपीस : 160, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 230. अंडी : गावरान : शेकडा : 600, डझन : 84 प्रति नग : 7. इंग्लिश : शेकडा : 330 डझन : 48 प्रतिनग : 4.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)