“सडक 2′ मध्ये संजय आणि पूजाबरोबर आलियाही

25 वर्षापूर्वी 20 डिसेंबर 1991 संजय दत्त आणि पूजा दत्तची ‘सडक’ हा सिनेमा रिलीज झाला होता. आता या सिनेमाचा सिक्वल बनवला जात आहे. सिनेमात आलिया भट्ट देखील दिसणार आहे. महेश भट्टच्या “सडक 2′ संदर्भात महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत.

महेश भट्टचा हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला आलिया भट्टसोबत महेश भट्टच्या ऑफिस बाहेर पाहिल गेले आहे. या सिनेमाबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पूजा भट्टने एक पोस्ट शेअर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सडक 2′ हा सिनेमा 1991 मध्ये आलेल्या “सडक’चा सिक्वल आहे. सिनेमात संजय दत्त आणि पूजा भट्ट लीड रोलमध्ये आहे. असे सांगितले जाते आहे की, पूजा या सिनेमांत अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारी देखील साकारत आहे. संजयपेक्षा पूजा भटचे पडद्यावरचे पुनरागमन ही या “सडक 2’ची खासियत असणार आहे.

विशेष म्हणजे ती आपली हाफ सिस्टर अलियाबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. संजय दत्तच्या गाजलेल्या सिनेमांपैकी “सडक’ हा एक होता. त्यामुळे त्याच्या सिक्‍वेलबाबत औत्स्युक्‍य असणारच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)