सट्टा आयुष्याला बट्टा

किरण भवरे 

मोबाईल गेमवर खेळला जातो जुगार


नियंत्रण आणण्यात पोलीस हतबल

पुणे – जुगारामुळे आजपर्यंत कित्येक कुटुंबांची राखरांगोळी झाली आहे. ग्रामीण भागामध्ये राजसोसपणे जुगार खेळला जातो. आता, तर जुगार खेळण्यासाठी मोबाईल सारखी अनेक माध्यमे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तरूण पिढी त्याच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते आहे. पूर्वी सोरट सारख्या पद्धतीपुरता मर्यादित असलेला जुगार आता क्रिकेट सारख्या खेळावरही लावला जात आहे. याच सट्टा लावण्यातून कर्नाटकमधील चामराजनगरातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने सट्टा लावल्याने आयुष्यालाच “बट्टा’ लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

कोणत्याही प्रकारचा सट्टा खेळवला जात असल्यास कडक कारवाई केली जाईल. विशेषतः क्रिकेटच्या सामन्यांवर लक्ष्य असून त्याबाबत पोलीस विभाग दक्ष आहे. सट्टा खेळला जात असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. सोशल मीडिया तसेच व्हॉट्‌सऍपच्या विविध ग्रुपवर ही आमचा वॉच आहे. याबाबत ग्रामीणच्या सायबर पोलीस विभागातर्फे आम्हाला सूचना केल्या जातात. त्यानुसार बारकाईने लक्ष ठेवले जाते.
– राम पठारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड-आंबेगाव

एखादी घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा सरसावते. परंतु, ती घटना घडूच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात खेळल्या जाणाऱ्या तीनपत्ती, रम्मी अशा जुगारांवर धाड टाकून आळा घालता येतो. पोलीस वेळोवेळी जुगार अड्ड्यांवर कारवाई ही करतात. पण, आता विविध खेळांवर सट्टा, जुगार खेळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे विशेष म्हणजे ऑनलाईन, मोबाईल यावर हा प्रकार सहज उपलब्ध होत असल्याने अशा अवैध प्रकाराकडे युवावर्ग वळू लागला आहे.

विविध गेमवर खेळला जातो जुगार
मोबाईलवर आता मनोरंजनासाठी विविध गेम उपलब्ध आहेत. त्यातील अनेक असे गेम आहेत की ज्यामध्ये दोन किंवा अधिक जण ते खेळू शकतात. त्यावर ही सट्टा लावला जात आहे. लुडो सोरख्या गेमवर याअगोदर ही बंदी आणण्याची मागणी झाली होती. या गेमच्या आहारी मुले जात असल्याने ही मागणी केली जात होती.

स्नूकर पोलवर ही जुगार
जिल्ह्यात स्नूकर बॉल हा गेम सर्वत्र खेळला जातो. आता, तर खेड्यापाड्यात हा गेम पोहोचला आहे. मात्र, या गेमवर काही ठिकाणी पैसे लावून खेळला जात आहे. त्यामुळे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. पोलिसांचे ही याकडे दुर्लक्ष होत असून अल्पवयीन मुलांना पैसे लावून खेळण्याची सवय लागत असल्याचे दिसत आहे.

बांग्लादेशमधील सामन्यांवर दौंडमधून सट्टा
दौंड शहरामध्ये 26 नोव्हेंबर 2017 मध्ये बांग्लादेश प्रीमीयर लीगच्या सामन्यावर सट्टा लावला जात असल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी आरोपींवर कारवाई केली होती. बांग्लादेशमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांवर दौंडमध्ये सट्टा लावला गेला तर भारतात सध्या सुरू असलेल्या सामन्यांवर सट्टा लावला जात नाही, असे म्हणता येणार नाही. तसेच गावागावामध्ये सामन्यांवर वैयक्‍तिकपणे मित्रांमध्ये सट्टा लावण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)