सज्ञान दाम्पत्याच्या विवाहात खाप पंचायतीचा हस्तक्षेप बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली – दोन सज्ञान व्यक्तींच्या विवाहात खाप पंचायतींना हस्तक्षेप करता येणार नाही त्यांचा अशा प्रकारचा हस्तक्षेप हा बेकायदेशीर आहे आणि मुळात विवाहासारख्या विषयावर निर्णय घेण्यासाठी अशा प्रकारच्या खाप पंचायतींच्या बैठकाच आयोजित करणेही बेकायदेशीर आहे असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज हा निर्णय दिला. जात पंचायतींचे अशा प्रकारचे हस्तक्षेप रोखण्यासाठीची मार्गदर्शक तत्वेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी घालून दिली आहेत. या संबंधात संसदेने कायदा करेपर्यंत ही मार्गदर्शक तत्वे अंमलात राहतील असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. जात बाह्य विवाह करणाऱ्या युवकांना ठार मारण्याचे प्रकार घडत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शक्ती वाहिनी नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने सन 2010 मध्ये एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

त्यावर निर्णय देताना हा निकाल देण्यात आला आहे. जेव्हा दोन सज्ञान युवक युवती स्वत:हून विवाह करण्यास राजी होतात त्यावेळी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही किंवा त्यावरून हिंसाचारही माजवता येणार नाही असे न्यायालयाने नमूद केले आहे. ज्या विवाहित दाम्पत्यांना अशा पंचायतींकडून धोका आहे त्यांना राज्य सरकारने संरक्षण दिले पाहिजे अशी भूमिका केंद्र सरकारच्या वकिलानेही यावेळी न्यायालयात घेतली. खाप पंचायतींनाही कोर्ट मान्यता देणार नाही असेही न्यायालयाने यावेळी सूचित केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)