सज्जनांचा सत्कार करण्यास सदैव तयार : पंकज देशमुख

सातारा तालुक्‍यातील गणेश मंडळांचा सन्मान; समाजाला उपयोगी कामे करण्याचा सल्ला

सातारा- जिल्ह्यातील गणेश मंडळांनी त्यांच्याकडे असलेल्या शक्‍तीचा वापर समाजाच्या हितासाठी करावा. असे काम करणाऱ्या सज्जनांचा सत्कार करण्यास सातारा जिल्हा पोलिस दल सदैव तयार असेल, असे जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख म्हणाले. सातारा उपविभागातील चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळांना गणराया ऍवार्ड वितरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने,पो.नि. नारायण सारंगकर, किशोर धुमाळ, प्रदीपकुमार जाधव, स.पो.नि. पोरे, घाडगे,शेलार,ढेकळे,शाळीग्राम, चौधरी यांच्यासह पोलिस अधिकारी,कर्मचारी व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पंकज देशमुख म्हणाले सातारा जिल्हा हा शांतता प्रिय आहे. साताऱ्याची गणेश मंडळे ही समाज हिताला प्राधान्य देणारी आहेत. त्यामुळे पोलिस दलाचा भार काहीसा हलका होतो. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या लोकांना पोलिसांचे कायम सहकार्य राहील. त्याचबरोबर चांगले काम करणाऱ्यांच्या आड येणाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही करूच, असा विश्‍वास त्यांनी दिला.

सातारा शहरातील नवतरूण गणेश मंडळ, गुरूवार पेठ,सातारा,जय हणुमान सांस्कृतीक मंडळ, गोडोली,नेहरू युवा मंडळ, शिवनगर,मंगलमुर्ती मंडळ, संभाजीनगर यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय,तृतीय,चतुर्थ असे क्रमांक देण्यात आले. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीमंत सम्राट गणेश मंडळ,सातारा युवक कल्याण मंडळ,शाहूपुरी, सप्ततारा गणेश मंडळ,यादोगोपाळ पेठ, प्रतापसिंह गणेश मंडळ, मोती चौक यांना अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय,चतुर्थ असे क्रमांक दिले. सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालगणेश मंडळ रेणावळे, नेहरू युवा मंडळ वेळे,सार्वजनिक गणेश मंडळ परळी,ए .वन. गणेश मंडळ कुशी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय, चतुर्थ असे क्रमांक देण्यात आले. यावेळी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)