सज्जनगड रस्त्यावरील अपघातात वाढ

ठोसेघर – गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रभातने सातारा ते सज्जनगड रोड दरम्यान असलेल्या रस्त्यावरील गजवडी फाट्यावरील तीव्र वळण वाहनचालकांनासाठी धोकादायक झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याचाच प्रत्यय या अपघातानंतर आला.

सज्जनगड मार्गे सातारकडे येणाऱ्या एका कारच्या चालकाला याच तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकली. सुदैवाने कार वळणावरील असलेल्या ओढ्यात गेली नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पावसामुळे वळणावर माती व खडीचे प्रमाण जास्त झाले असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दुचाकी घसरून छोटे मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पावसाळ्यातच या वळणावर असलेल्या ओढ्यावरील रस्त्याचा काही भाग खचला आहे. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुर्लक्ष केले जात आहे. पुलाच्या बाजूला संरक्षक कठडे नसल्यामुळे दिवसेंदिवस या वळणावरील वाहतूक धोकादायक होत चालली आहे. रस्ता खचून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही खचलेल्या रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जात नसल्याने वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)