सज्जनगड येथे चतुर्वेद संहिता पारायण व ऋग्वेद स्वाहाकार सोहळ्याचे आयोजन

समर्थ सेवा मंडळातर्फे पाच दिवसाच्या सोहळ्यात मान्यवरांची किर्तने, गायन प्रवचने

सातारा – सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळातर्फे सज्जनगडावर येत्या 24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत चतुर्वेद संहिता पारायण व ऋग्वेद स्वाहाकार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वेद परिचयावर मान्यवरांचे निरुपण होणार आहे, अशी माहिती कार्यवाह मारुतीबुवा रामदासी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी योगेशबुवा रामदासी, रमेशबुवा शेंबेकर, गजानन बोबडे, मधू नेने आदी उपस्थित होते. सोहळ्याचा उद्‌घाटन समारंभ शनिवारी 24 नोव्हेंबरला सकाळी 9.30 ते 12 या वेळेत संपन्न होणार असून करवीर पीठाचे शंकराचार्य श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते व हिमालयातील बद्रिकाश्रमाचे शंकराचार्य जगतगुरु ज्योतिषपीठाधिश्‍वर स्वामी श्रीवासुदेव सरस्वती महाराज हे समारंभाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. या उद्‌घाटन सोहळ्यात स्वामी गोविंदगिरी महाराज सुप्रसिध्द वारकरी प्रवचनकार चैतन्यकर महाराज देगलूरकर व काशी येथील गणेशशास्त्री द्रवीड आदी विद्वानांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच प. पु. जितेंद्रनाथ महाराज, प. पु. राजेंद्रनाथ शास्त्री, प. पु. सामवेदाचार्य राममुर्ती श्रौती वेदमुुर्ती कृष्णशास्त्री आर्वीकर, गोपाळशास्त्री दिनकरभट्ट जोशी, वेदमुर्ती शांताराम शास्त्री भानोसे, वेदमुर्ती विवेककशास्त्री गोडबोले, वेदमुर्ती कृष्णाशास्त्री पळसकर हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी 6.30 वा. चर्तुवेद सहिता पारायण शुभारंभ, ऋग्वेद स्वाहाकार शुभारंभ, गणेश पूजन, पुन्याह वाचन, वेदग्रंथ पूजन, अग्नीस्थापना, पीठस्थापना, पीठपूजा व स्वाहाकाराला प्रारंभ होणार आहे.
उद्‌घाटन सोहळ्यानतर दुपारी 4 ते 6 या वेळेत काशी येथील गणेशशास्त्री द्रवीड प्रवचन होवून रात्री 9 ते 11 समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे किर्तन होणार आहे. दि. 25 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत प्रकाश शास्त्री दंडगे यांचे प्रवचन व 9 ते 10 या वेळेत परभनी येथील दिनकरभट्ट जोशी यांचे प्रवचन होणार आहे. सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत गोविंददेवगिरी महाराजयांचे प्रवचन तर दुपारी 4 वा. धनंजयशास्त्री वैद्य यांचे प्रवचन होणार आहे. रात्री 9 वा. चारुदत्त बुवा आफळे यांचे किर्तन होणार आहे. सोहळ्यात 26 रोजी रात्री 9 वा. पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन, दि. 27 रोजी रात्री 9 वा. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचे गीतरामायण होवून दि. 28 रोजी स. 11 वा. सोहळ्याचा सांगता समारंभ संपन्न होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम सर्व भावीकांसाठी विनामुल्य असून या स्वाहाकार सोहळ्यास सातारा जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मारुतीबुवा रामदासी यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)