सज्जनगडावर रोप वेची सुविधा करा

अरुण गोडबोले यांचे नितीन गडकरी यांना अनावृत्त पत्र

सातारा – राज्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ आणि धार्मिक ठिकाण असलेल्या सज्जनगडावर रोप वे सुविधा उपलब्ध करुन भाविकांची सोय करावी अशी मागणी एका अनावृत्त पत्रामार्फत साताऱ्यातील ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोडबोले यांनी म्हटले आहे,समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी देश आणि परदेशातून हजारो भाविक तेथे येत असतात.गेल्या काही वर्षात गडावर जाणे थोडे सोपे झाले असले तरी पण तरीही पन्नास पंचावन वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना आजही खूप कष्टाचे आहे. अनेकांना तर ते अशक्‍यही होते अशा भाविकांना मग” डोली ” चा आधार घेवून लोकांनी त्यानं उचलून नेण्याचा मार्ग पत्करावा लागतो.यातून मार्ग काढण्यासाठी तेथे रोप वे झाला तर सुलभ होईल, भाविकांची मोठी सोय होईल शिवाय पर्यटनास चालना मिळेल. गडाचेही महत्व वाढेल.

यासाठी 2009 च्या म्हणून सुमारास मी प्रयत्न केले होते,असे सांगून गोडबोले यांनी म्हटले आहे, तेव्हा सर्वांनी सहकार्य केले. सर्व्हे झाला.बी ओ टी तत्वावर ती करण्याचे ठरले. परंतु काही स्थानिक संस्थांनी विरोध केल्यामुळे ते सर्व प्रयत्न बारगळले .त्यांनतर 1016 च्या जुन मध्ये काही भक्त आपणास भेटले होते. आपणासही ती कल्पना आवडली व केंद्र सरकारच्या निधीतून ती पूर्ण करण्याचा मनोदय आपण व्यक्त केलात. त्याप्रमाणे आपण ना, चंद्रकांत दादा याना प्रस्ताव तयार करण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यांनीही पुण्याच्या मुख्य अभियंत्याकडून अहवाल मागवला होता, त्याप्रमाणे पाहणी होताना पुन्हा पूर्वीच्याच लोकांनी विरोध दाखवला.त्यामुळे आज तागायत पुढे काहीही झाले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)