सज्जनगडावर प्रेमी युगलाची आत्महत्या

विवाहित महिलेसह प्रियकराने घेतली दरीत उडी
सातारा,दि.14(प्रतिनिधी)
भावकीतील दोघांचे असलेले प्रेम संबंध घरातील लोकांना मान्य नसल्याने दोघांनी सज्जनगडावर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.सज्जनगडाजवळ असलेल्या खोल दरीत उडी मारत या दोघांनी आत्महत्या केली. पुनम मोरे,अंकुश मोरे (दोघे रा.बोडकेवाडी,ता.पाटण) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. घटनास्थळी सातारा तालुका पोलिस व सह्याद्री ट्रेकस,सातारा ट्रेकर्सच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
पुनम हिचा सात वर्षापुर्वी अभय मोरे याच्यासोबत विवाह झाला होता. तेव्हापासून ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास होती. मात्र तीचे त्याच गावातील अभय याच्या भावकीतील नात्याने चुलत दीर असलेल्या अंकुश मोरे याच्याशी प्रेमसंबंध जुळले होते.याची काणकुण घरातील लोकांना लागली होती. या प्रेमसंबंधाला पुनमचा पती अभय याचा विरोध होता. त्यामुळे पुनम व अंकुश यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. त्यानुसात ते दोघे मुंबई येथून बुधवारी सातारा येथील सज्जनगडावर फिरायला आले होते. त्यानंतर त्यांनी गडाच्याजवळ असलेल्या दरीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी व सह्याद्री ट्रेकर्स सातारा ट्रेकर्सच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणले होते. बुधवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी दोघांच्याही नातेवाईकांशी संपर्क साधुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मुलगा सोबत होता
पुनमने आपला सहा वर्षाचा मुलगा देवराज यालाही सोबत आणले होते.आत्महत्या करण्यापुर्वी तिने लहानग्या देवराजला शेजारीच असलेल्या दगडावर बसवला होता.काही वेळाने आत्महत्येची घटना उघड झाली तेव्हा देवराज सुखरुप होता.पण त्याला काहीच समजत नव्हते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)