सज्जनगडावरील दरीत पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

सातारा
गजवडी येथील ज्ञानश्री महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या अनिकेत विष्णू ननावरे (वय 18, रा. खुंटे तालुका फलटण) यांचा सज्जनगड येथील दरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला . ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. ट्रेकर्सच्या साह्याने त्याचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला .
याबाबत अधिक माहिती अशी की ,अनिकेत विष्णू ननावरे हा युवक येथील गजवडी येथील ज्ञानश्री महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. शिक्षणानिमित्त तो त्याचे चुलते वामन बापू भंडारे (राहणार गजवडी ता. जि. सातारा) यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून राहण्यास होता. तो नित्यनियमाने कॉलेजला जात असे. शनिवार दि 4 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान अनिकेतने घरात मी फिरू नेतो असे सांगून तो घरातून निघून गेला . सज्जनगडावरील धाब्याचा मारुती कड्याच्या ठिकाणी तो उभा असताना पावसामुळे घसरण झालेल्या दगडावरून त्याचा पाय घसरला व तो 60 , 70 फूट खोल दरीत पडला .यामध्ये त्याच्या डोक्‍याला व इतर ठिकाणी जोरात मार लागल्याने त्यांचा दरीतच मृत्यू झाला . याबाबत पोलिसांना समजताच ट्रेकरच्या सहाय्याने त्याचा मृतदेह दरीतून वर काढण्यात आला. याबाबत उत्तम कृष्णा भंडारे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
अपघात की आत्महत्या ?
सज्जनगडावरील धाब्याचा मारुती कड्यावरून पाय घसरून पडलेल्या अनिकेत विष्णू ननावरे यांचा पाय घसरुन अपघाती मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू होती . शवविच्छेदन अहवालानंतरच त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होणार आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)