सज्जनगडाच्या तटबंदीचे दगड निसटून पायर्‍यांवर

पावसामुळे तटबंदी होतेय कमकुवत
सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – सज्जनगड परिसरात संततधार सुरू असल्याने गडाच्या छत्रपती शिवाजी महाद्वार बुरुजाच्या शेजारील तटबंदीचे दगड सुटे होवून पायर्‍यावर आले.
सज्जनगड, ठोसेघर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिवृष्टी झाली आहे. यामुळे दरड कोसळण्याचा असतानाच सज्जनगडाच्या छत्रपती शिवाजी महाद्वार बुरुजाच्या शेजारील तटबंदीचे दगड सुटे होवून गडावर जाणार्‍या पायर्‍यांवर आले. शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे गडावर येणार्‍या भाविकांनाही येताना गैरसोय होत होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)