सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 45व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यावर सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. यामध्ये विद्यमान आणि माजी क्रिकेटपटूंचा प्रामुख्याने समावेश होता. “हॅपीबर्थडेसचिन’ हा आजचा सर्वाधिक लोकप्रिय ट्रेंड ठरला. नोव्हेंबर 2013 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला सचिन आजही किती लोकप्रिय आहे, याची पावती त्यातून मिळाली. सचिनचा माजी सलामी साथीदार वीरेंद्र सेहवाग व श्रेष्ठ फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण या माजी खेळाडूंसह लोकेश राहुल व सुरेश रैना यांच्या शुभेच्छांना विशेष प्रतिसाद मिळाला. आपल्या खेळाने कोट्यवधी भारतीयांना एकत्र आणणाऱ्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा सचिन तेंडुलकर हा नेहमीच एक दंतकथा बनून राहिला, असे रैनाने आपल्या संदेशात म्हटले आहे. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)