सचिनने घेतला गल्ली क्रिकेटमध्ये सहभाग 

मुंबई – बांद्रा येथील मेट्रोच्या साईटवर रात्री रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात काही युवक गल्ली क्रिकेट खेळत असताना अचानक एक मोटार थांबली आणि त्यातून साक्षात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खाली उतरला. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबत सचिनने काही वेळ क्रिकेटचा आनंदही लुटला. मात्र चाहत्यांनी त्याला ओळखून गर्दी करण्यास प्रारंभ केल्यावर सचिन थांबला आणि चाहत्यांशी हस्तांदोलन करून त्याने काढता पाय घेतला. सचिन खेळत असल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रेही लवकरच सचिनचा बालमित्र विनोद कांबळीने सोशल मीडियावरून व्हायरल केली. 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)