सचिनने अतिवृष्टीनंतर दिला मुंबईकरांना ‘हा’ सल्ला

मुंबई- भारताचा क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबईकरांसाठी फेसबुक आणि ट्‌विटरवरून एक भावनिक संदेश दिला आहे. या ट्‌विटमध्ये प्रत्येकाने सुरक्षितपणे घरी पोहोचा, स्वत:ची काळजी घ्या असे सचिनने मुंबईकरांना आवाहन केले आहे. सचिनच्या या ट्‌विटनंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईतील रस्ते नद्या, तलाव बनून वाहत होते. अनेक जण मंगळवारी कार्यालयातच अडकले होते. येत्या 24 तासात आणखी मुसळधार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा, कॉलेजसला तर काही खाजगी कार्यालयांना ही सुट्टी आहे. पावसात अडकलेल्यांच्या मदतीसाठी मुंबईकर धावून आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)