सचिनची उणीव भासेल – पंतप्रधान

नवी दिल्ली – सचिन तेंडुलकरसह राज्यसभेतील ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपला.आपला कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या खासदारांना निरोप देण्यासाठी  राज्यसभेत गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मोदींनी उपसभापती कुरियन आणि खासदार सचिन तेंडुलकर यांच तोंडभरून कौतुक केलं. तसेच यापुढे सचिन तेंडुलकर यांची उणीव भासेल असंही ते म्हणाले.

२०१२ साली सचिनला सहा वर्षांसाठी राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. परंतु, सचिनला क्रिकेटप्रमाणे राज्यसभेत खास छाप पाडता आली नाही. सभागृहातील उपस्थितीवरूनही सचिनला विरोधकांनी धारेवर धरले होते. त्यानंतर मात्र सचिननं अनेकदा सभागृहात हजेरी लावली. राज्यसभेत बोलू न दिल्यानं त्यानं फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड करत चाहत्यांशी संवादही साधला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)