सातारा: सख्ख्या बहिणींकडून फसवणूक; दोघींवर गुन्हा

नागठाणे – सातारा तालुक्‍यातील नागठाणे येथील महाराष्ट्र बॅंकेत एका महिलेने पेन्शन व बचत खात्यावरील खोटे संमतीपत्र तयार करून बोगस सह्या करून सख्या बहिणींची फसवणूक करत सुमारे 98 हजार रुपये रक्कम नावे करून फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित सौ. हेमलता दिलीप पवार (रा.नांदवळ ता.कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेणेगाव (ता. सातारा) येथील सुभद्रा सोपान सावंत यांचा मृत्यू एप्रिल 2017 मध्ये झाला होता. मृत सुभद्रा यांच्या वारस म्हणून जयश्री आनंदराव जगदाळे (रा. कारंडवाडी ता.सातारा), हेमलता पवार व माधुरी गणेश गायकवाड या तीन मुली आहेत. सुभद्रा यांना पेन्शन मिळत असताना त्यांच्या पश्‍चात त्यांच्या नावावरील खात्यावरील रक्कम तिघा बहीणींचा हक्क असल्याचे बॅंकेच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र संशयित हेमलता पवार हिने जयश्री या बहिणींचे खोटे संमतीपत्र तयार करून बोगस सह्या करून 98 हजार रुपये रक्कम नावे करून फसवणूक केल्याची फिर्याद जयश्री आनंदराव जगदाळे यांनी बोरगाव पोलिसात दिली आहे. तपास हवालदार भीमराव यादव करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)