“सक्षम’ मनुष्यबळाअभावी पर्यावरण विभागाची “लढाई’

– आयुक्‍तांना महापौरांचे साकडे : महत्त्वाकांक्षी प्रकल्प कसे मार्गी लागणार?

पिंपरी – “सांडपाणी पुन:वापर प्रक्रिया, वेस्ट टू एनर्जी, नदी सुधार प्रकल्प आदी शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने संबंधित प्रकल्प “रोल मॉडेल’ आहेत. मात्र, हे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी असलेल्या पर्यावरण विभागाडे सध्यस्थितील “सक्षम’ मनुष्यबळ नाही. परिणामी, प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

महापालिका पर्यावरण विभागाकडे सध्या एक कार्यकारी अभियंता, दोन उपअभियंता आणि तीन कनिष्ठ अभियंता यांच्यासह एकूण 22 कर्मचारी आहेत. पूर्वी विभागाला पाच कनिष्ठ अभियंता होते. त्यापैकी दोघांची बदली झाली आहे. त्यामुळे उर्वरित अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्‍त ताण येत आहे.

पर्यावरण विभागाच्या वतीने सध्या मोशी येथील घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत विविध प्रक्रिया प्रकल्पांचे कामकाज सुरू आहे. तसेच, वेस्ट टू एनर्जी, हॉटेल वेस्ट ते बायोगॅस, सी ऍन्ड डी वेस्ट प्रकल्प, ई- वेस्ट प्रकल्पा आदी अत्याधुनिक प्रकल्प प्रस्तावित आहेत. महापालिकेच्या 13 मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि 31 पंपिंग स्टेशनच्या चालन, देखभाल व दुरुस्तीचे कामकाज पाहिले जाते. मात्र, पर्यावरण विभागाकडे अशा प्रकारच्या प्रकल्पांचे काम सक्षमपणे करू शकतील, असे मनुष्यबळ किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव असलेले कनिष्ठ अभियंता उपलब्ध नाहीत. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. कारण, सक्षम मनुष्यबळाअभावी पर्यावरण विभाग “वसुंधरेच्या रक्षणाची लढाई’ कशी जिंकणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्रस्तावित विविध अत्याधुनिक प्रकल्पांसाठी तसेच मैलाशुद्धीकरण प्रकल्प व पंपींग स्टेशन चालन, देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे स्वरुप पाहता कमीत-कमी दोन कनिष्ठ अभियंता तातडीने उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आम्ही महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)