सक्षम उमेदवार नसल्याने ते नैराश्‍यापोटी टिका करतात

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मंचर- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नेहमीच विकास करणारा नेता किंवा पक्षाच्या विरोधात राळ उठवतो. विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याने ते नैराश्‍यापोटी माझ्यावर टिका करतात. हे मतदारांना ठाऊक आहे. कोणी कितीही विजयाच्या वल्गणा केल्या तरीही माझा विजय निश्‍चित आहे, असा विश्‍वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राम गावडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, तालुकाप्रमुख सुनील बाणखेले, पंचायत समितीचे सदस्य रविंद्र करंजखेले, शितल तोडकर, जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर, अलका घोडेकर, शहरप्रमुख तुकाराम काळे, गोविंद काळे, विजय आढारी, प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार आढळराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजित केलेली हल्लाबोल व परिवर्तन यात्रा कुचकामी ठरल्या आहेत. विरोधी उमेदवार कोणीही असू द्या, आपण शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा खासदार होणार आहे. अरुण गिरे म्हणाले की, तालुक्‍यातील 143 गावांपैकी 50 गावे आज तहानलेली आहेत. त्यांना कायमस्वरुपी योजना देण्यासाठी खासदार आढळराव यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. घोडेगाव-पेठ जिल्हा परिषद गटात 4 वर्षांत 15 कोंटींची कामे झाल्याचे देविदास दरेकर यांनी सांगितले.
यावेळी मिलिंद काळे, तुकाराम काळे, दिलीप वाळुंज, दिलीप पवळे, महेश ढमढेरे, यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन राजेश काळे यांनी केले. सचिन बांगर यांनी आभार मानले. दरम्यान दहशतवाद्यांनी सैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा या मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने निषेध करुन पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)