सक्षम अधिकारीच बैठकीला पाठवा

विभागांना सूचना देण्याची जिल्हा परिषद सदस्यांची मागणी

पुणे – जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तसेच विकासाच्या दृष्टीने आयोजीत समितीच्या बैठकांना ज्या विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले आहे, त्या विभागाकडून सक्षम अधिकारी पाठविणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापुढे सक्षम अधिकारीच बैठकीला उपस्थितीत राहतील याबाबत सर्व विभागांना सूचना द्याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष विश्‍वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली.

पुणे जिल्हा परिषद म्हणजे “मिनी मंत्रालय’, जिल्ह्यातील सर्व विकासकामांचा शुभारंभ येथूनच होतो. त्यामध्ये विविध विभागांचा समावेश असतो. महावितरण, जलसंपदा, परिवहन, बांधकाम विभाग यासह अन्य विभागांच्या सहकार्यातूनच जिल्ह्यातील विकासकामांना गती मिळण्यास मदत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने बोलविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभा, स्टॅंडींग कमिटी यासह अन्य समितीच्या बैठकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रीत केले जाते.

या बैठकांना अधिकारी उपस्थित असतील तर संबंधित गावातील किंवा तालुक्‍यातील प्रश्‍न त्वरीत मार्गी लागतील. कामातील अडचणी, समस्या समजतील आणि तत्काळ त्याचे निरसनही करता येईल, हा यामागचा उद्देश आहे. परंतु, काही विभागांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

“त्याच्याकडून लेखी खुलासा घ्या’
ज्या विभागांकडून अधिकारी उपस्थित राहतात, त्यातील काही अधिकारी नवीन असतात किंवा ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असे पाठविले जातात. त्यामुळे सदस्यांकडून अधिकाऱ्यांची चांगलीच पोलखोल होते आणि अधिकारी शांततेच्या भूमिकेत असतात. दरम्यान, जिल्हा परिषदेत नुकतीच जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा झाली. या बैठकीला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगितले. परंतु, या विभागाकडून कार्यकारी अभियंता उपस्थित न राहिल्यामुळे सदस्यांचा पारा चढला. त्यावेळी सदस्यांनी त्याचा जाब विचारत, जे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत त्यांच्याकडून लेखी खुलासा घ्यावा आणि यापुढे सक्षम अधिकारी बैठकीला उपस्थित राहण्याबाबत बंधनकारक करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)