सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेचा उडाला फज्जा

संग्रहित फोटो

लक्ष्मण ढोबळे 

विद्यार्थ्यांची शाळेला दांडी, शिक्षकांना नाहक त्रास 


पालकांना मात्र बिबट्याची धास्ती

पारगाव शिंगवे- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 1 मार्च पासून मराठी मुलांची शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सकाळच्या सत्रात शाळेत मुले येत नसल्याने या निर्णयाचा पुरता फज्जा उडाला असून विद्यार्थी हजर राहत नसल्याने शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर आंबेगाव, जुन्नर, शिरुर हे तालुके बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते. उसाची शेती तसेच वनक्षेत्रात बिबटे आढळत असतात. बिबट्यांचा वावर असतो. यामुळे पालक लवकर सकाळी मुलांना शाळेत पाठवत नाहीत. तसेच पालकांमध्ये वेळेमुळे नाराजी पसरली आहे.

यावर्षी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या वेळेपेक्षा महिनाभर अगोदर सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 ते 12 या वेळेत शाळा भरविण्यात येते. सकाळी मुलांना शाळेत येण्यासाठी पहाटेपासून तयारी करावी लागते. लहान मुलांना सकाळी लवकर जाग येत नाही अथवा लवकर उठू शकत नाही, अशी ओरड पालकांची होत आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अनेक महिला शिक्षिका कुटुंबातील जबाबदारी पार पाडून विद्यादानाचे काम करतात. मात्र, त्यांना सकाळी शाळेत लवकर येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी सकाळी शाळेला भेट देत आहेत. त्यामुळे कुचंबना होत आहे.

शाळेत मुले का येत नाहीत. तसेच शिक्षक थोडे उशिरा आल्यानंतर त्यांना उशीर का झाला? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी मोबाईलमध्ये मुलांबरोबर शिक्षकांचाही सेल्फी काढण्यात येतो. त्यामुळे शिक्षक व पालकांमध्ये वेळ जुळत नसल्याने नाराजी आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय घेण्याअगोदर शिक्षक व पालकांबरोबर चर्चा करावी लागत होती. या संदर्भात पालकांशी चर्चा केली असता. शाळेची वेळ ही सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत असावी, असे अनेक पालकांनी सागितले.

शाळा व्यस्थापन समितीची आणि पालकांची बैठक घेण्यात येणार असून मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहेत. तसेच शाळांच्या वेळेत बदल झाल्यानंतर मुलांची संख्या वाढत आहे.
– पोपटराव महाजन, गटशिक्षण अधिकारी


सकाळी 7.30 ते 11.30 दरम्यान शाळेची वेळ असावी. तसेच सकाळी भरविण्यात येत असलेल्या शाळेचे महत्त्व पालकांना पटवून देणे गरजेचे आहे.
– नानासाहेब ढोबळे, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष


शाळा 12 वाजता सुटत असल्याने मुलांना भर उन्हात घरी जावे लागत आहे. शाळेच्या वेळेत बदल करावा तसेच शिक्षकांनी आपली मुले इंग्रजी माध्यमिक शाळेत पाठविण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत पाठविण्यात यावीत.
– शांताराम ढोबळे, शाळा व्यस्थापन समिती सदस्य व शिक्षणतज्ज्ञ


मुले सकाळी लवकर उठत नाहीत. तसेच जेवन करुन जात नसल्याने आजारी पडण्याची भीती असते. शाळेची वेळ 7.30 असावी तर वेळेत सर्व तयारी होऊ शकते.
– भावना चौधरी, पालक


रानात सर्वत्र ऊस पिके असल्याने मुले शाळेत लवकर पाठविण्यात भीती वाटत आहे. त्यामुळे मुलांबाबत काळजी वाटते.
– संदीप दातखिळे, पालक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)