सकाळच्या गारव्यात जमली बुध्दिवंतांची मांदियाळी

सातारा – सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवाच्या 20 व्या वर्षात बऱ्याच गोष्टी नव्याने घडत आहेत. साहित्य शिरोमणी पु. ल. देशपांडे, व ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या मान्यवरांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याला वाहिलेल्या ग्रंथमहोत्सवाची सुरूवात शुक्रवारी सकाळी ग्रंथ दिंडीने झाली.

सकाळच्या गारव्यात नगराध्यक्ष माधवी कदम माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, कार्यवाह शिरीष चिटणीस व डॉ. यशवंत पाटणे या मान्यवरांनी ग्रंथदिंडीला खांदा दिला आणि ग्रंथदिंडीची बापूजी साळुंखे नगरीकडे वाटचाल सुरू झाली. यावेळी आयोजित सातारा शहरातील वेगवेगळ्या शाळांनी सादर केलेल्या चित्ररथांनी वातावरणात रंग भरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा जिल्ह्याचा पूर्वभाग दृष्काळाशी सामना करत असताना पाणी वाचवा असा प्रबोधनात्मक संदेशही यानिमित्ताने पाहायला मिळाला. सातारा शहरातील वेगवेगळ्या शाळांनी येथील गांधीमैदानात लेझिमची जोरदार प्रात्यक्षिके सादर केली. सुमारे 8 शाळांच्या 360 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला होता. रामगणेश गडकरी यांचे विचार, शिक्षणमहर्षी बापूजी साळुुंखे यांची शिक्षण साधना, स्वामी विवेकानंद यांचे देशनिष्ठ विचार अशा विविध विषयांवर कल्पकतेने चित्र रथ सादर करण्यात आले होते. साहित्य जागरासाठी या उपक्रमात सहभागी होण्याकरीता प्रत्येकजण उत्सुक होता.

सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. पालखीमध्ये शताब्दी महोत्सवातील मान्यवरांच्या साहित्यकृती ओळीने मांडून ठेवण्यात आल्या होत्या. नगराध्यक्षा माधवी कदम व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी श्रीफळ वाढवून ग्रंथ पालखीला खांदा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिमचा जोरदार गजर केला. यावेळी कार्यवाह डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस, सुनिता कदम, प्रल्हाद पार्टे, डॉ. राजेंद्र माने, साहेबराव होळ, संदीप श्रोत्री. प्रदीप कांबळे असे विविध मान्यवर उपस्थित होते. पुढे ग्रंथ पालखीच्या मागे चित्ररथ आणि लेझिमची प्रात्यक्षिके, असे बहारदार चित्र सकाळच्या गारव्यात राजपथावर पाहायला मिळाले. चित्ररथ शिस्तबध्दरितीने तालिमसंघ मैदानाकडे मार्गस्थ झाले. येथे नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)