सकारात्मक विचार करा, यश हमखास

कोपरगाव – कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल सकारात्मक विचार करणे गरजेचे असून सकारात्मक विचार असले तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. तुम्ही सकारात्मक विचार करा, यश हमखास मिळेल असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.

स्व.सौ. सुशिलामाई काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान कोळपेवाडी येथे वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण व वार्षिक पारितोषिक वितरणात अध्यक्षस्थानावरून काळे बोलत होते.यावेळी कोपरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. काळे म्हणाले, माई स्व. सौ.सुशीलामाई काळे यांच्या आग्रहास्तव मुलींसाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालय माजी खासदार स्व. शंकरराव काळे यांनी सुरु करून मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविला. हे शाळा महाविद्यालय काळे परिवाराच्या कुटुंबातील घटक असून या शाळांकडे आदर्श महाविद्यालय म्हणून पहिले जाते. प्रत्येक विद्यार्थिनींनी ध्येयवेडेपणा अंगीकारून सकारात्मक विचारांच्या साथीने यशाची शिखरे सर करावी. सर्व प्रकारच्या स्पर्धेत भाग घेवून प्राविण्य मिळवावे जोपर्यंत तुम्ही यशाला गवसणी घालत नाही तो पर्यंत प्रयत्न करीत राहा. मनात इच्छा असेल व त्याला प्रयत्नांची जोड मिळाल्यास सर्व काही शक्‍य असल्याचा काळे म्हणाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)