सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या…

मधुरा धायगुडे

जे आपण बदलू शकत नाही ते स्वीकारणे क्रमप्राप्तच असते मात्र ते सहन करण्याची ताकद मिळावी अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही व जे मी बदलवू शकते ती बदलण्याची ताकद, शक्‍ती मला मिळू दे. हे आपण करू शकतो आणि या दोन्ही मधला फरक ओळखणेसाठी योग्य बुद्धीची गरज असते, असा दृष्टिकोनदेखील “ताण’ कमी करण्यास मदत करेल आपल्या आवडीच्या कामात वेळ घालवला तरी देखील ताणापासून दूर राहता येईल. आयुष्यातल्या ताणतणाव प्रसंगाकडे विनोदवृत्तीने पाहायला शिकायला हवे. आपले व्यक्‍तिमत्त्व दुसऱ्याला प्रफुल्लित करणारे असावे. एखाद्या व्यक्‍तीचा स्वभाव एवढा बोलका असतो. व्यक्‍तिमत्त्व हसरे असते ही त्याचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. त्याच्या असण्याने देखील वातावरणात आनंद निर्माण होतो व आपला ही ताण नाहीसा होतो हे संतुलित व्यक्‍तिमत्त्व.

वेळेचे व्यवस्थापन देखील ताण घालवण्यासाठी महत्त्वाचे ठरते, आपल्याला उपलब्ध वेळेत आपण कामे वार पाडली तर अतिरिक्‍त ताण येत नाही त्यासाठी कामाची, अभ्यासाची योग्य विभागणी करणे गरजेचे ठरते. दहावीच्या मुलांपुरते बोलायचे झाले तर रोजचा रोज अभ्यास करणे, नंतर दैनंदिन अभ्यासाचा पुन्हा साप्ताहिक सराव करणे पुन्हा महिन्याचा सर्व अभ्यास व शेवटी आता वार्षिक परीक्षेचा अभ्यास अशा टप्प्याने गेले तर परीक्षेचा ताण कधीच येत नाही. म्हणजे अभ्यास किती केला यापेक्षा तो कसा केला किंवा करायचा हे समजून घेतले तर ताण येत नाही व तो कमी करण्याची गरजही भासणार नाही. मात्र, हे नियोजन दहावीच्या पहिल्या दिवसापासूनच हवे तरच शक्‍य होते.

व्यायामाचे महत्त्व तर तणावामधे खूपच आहे. योगासनामुळे मनाचे सामर्थ्य वाढते, व्यायामामुळे शरीरात “एडॉर्फिन्स’ नावाचे रसायन तयार होतात. ती रोगप्रतिकार क्षमता वाढवून ताणापासून निर्माण होणारी वेदना नाहीशी करतात. ताणतणावाची पूर्वकल्पना असेल तर आपण तयार राहतो व ताण टाळता येतो. सकारात्मक दृष्टिकोन हवा. कोणतीही गोष्ट मनापासून, आनंदाने करता यायला हवी, मनात आलेली कोणतीही गोष्ट ताबडतोब कृतीत आणावी. मग बोलू, नंतर करू अशी विधाने ताण वाढवू शकतात. आपल्याला काय मिळाले नाही त्यापेक्षा जे मिळाले त्याबद्दल ऋणी राहावे, गैरसमजुती, संशयी स्वभाव, एकलकोंडेपणा, अंधश्रद्धा तणाव निर्माण करतात यापासून दूर राहावयास हवे. कारण गेलेली वेळ परत येत नाही. वाया गेलेला वेळ तणावाचे कारण असू शकते, निर्णय घेण्यात उशीर केल्यामुळे देखील तणाव निर्माण होऊ शकतो.

ज्या गोष्टींची गरज असते त्यापासून आपण स्वतःला आणि कुटुंबाला दूर ठेवतो. ज्या गोष्टीशिवाय जगू शकतो अशा अवाजवी गोष्टींच्या मागे लागतो.दहावीच्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीतून जावे लागते पण काळजी, चिंता, तणाव निर्माण करतात तर सकारात्मकता, यश-अपयशाचा विचारही करू नये. कारण टक्केवारीने पाहिले तर जास्त मुले दहावी पास होतात तर कमी मुले नापास परीक्षेमधे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आनंदी राहण्यामुळे परीक्षेचा ताण जाणवत नाही. स्वसंवाद करा स्वतःशीच बोला व त्याचे निरीक्षण करा. मात्र, तो सकारात्मक संवाद हवा. “हो मला शक्‍य आहे’ अशी विधाने यश मिळवून देतात “”मला पूर्ण आत्मविश्‍वास आहे” मी पास होईन असे स्वसंवाद ताण कमी करतील.

या सर्वांवर योग्य उपाय म्हणजे योग्य आहार. कारण आपण जे करतो, अनुभवतो ते शरीरामार्फतच घेतो सात्विक आहार, सात्विकता, आनंद देतो ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन झाले तर आपले आयुष्य सुंदर होईल मग मात्र त्यासाठी आपल्यालाच ठरवायला लागेल.
पेला अर्धा भरला आहे,
असंही म्हणता येतं,
पेला अर्धा सरला आहे
असंही म्हणता येतं,
भरला आहे म्हणायचं?
की सरला आहे म्हणायचं?
हे आपणचं ठरवायचं.
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत,
की गाणं म्हणत?
तुम्हीच ठरवायचं…
मंगेश पाडगावकरांच्या या
ओळी सकारात्मक विचारांचं महत्त्वच सांगून जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)