सकारात्मक कृतीही हवी – डॉ. पठारे

वाघोली- जीवनात यश मिळवायचे असेल तर सकारात्मक विचारासोबत सकारात्मक कृतीही हवी असा संदेश रुबी हॉल क्‍लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे यांनी विद्यार्थ्याना दिला.
वाघोली (ता. हवेली) येथील भारतीय जैन संघटनेच्या उच्च माध्यमिक विभागाच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळेस प्राचार्य संतोष भंडारी, विकास अधिकारी सी. आय. कोचर, उपप्राचार्य दिलीप देशमुख, स्नेहसंमेलन प्रमुख पूनम सिंह, सांस्कृतिक विभागप्रमुख चंद्रकांत हिंडोळे, डॉ. गोविंद गोडसे, मुकुंद सावळकर,चंद्रकांत गव्हाणे, विजय अंधारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळेस वर्षभरातील आणि वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष भंडारी यांनी केले, तर आभार पूनम सिंह यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मुकुंद सावळकर यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)