सकारात्मकता आनंदी जीवनाची गुरुकिल्ली- प.पू.प्रतिभाकुंवरजी

निगडी – प्रत्येकाने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवले तर, जीवनातील, कुटुंबातील, समाजातील, राज्यातील व देशातील बहुतांशी समस्या संपुष्टात येतील. आनंदी व तणावमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने कर्म करताना सकारात्मकता ठेवली पाहिजे. सकारात्मकता हीच आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सुदृढ, सुसंस्कृत समाज उभारण्यासाठी सम्यक, सजग, सप्रेम राहायला हवे. प्रत्येकाने प्रत्येकाप्रती हृदयातून सप्रेम आभारी भावना ठेवून संवाद साधल्यास, आपले मत शांतपणे मांडल्यास समस्यांवर, संकटांवर विजय मिळविता येईल, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी म.सा. यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प्रतिभाकुंवरजी म्हणाल्या की, भूतकाळातील दु:खी घटनांचे स्मरण करून वर्तमानकाळातील आनंदावर विरजण पाडू नये. तसेच भविष्य काळातील धन संचयासाठी वर्तमानात दुष्कर्म करून, गर्व करून आजचा आनंदी क्षण, आनंदी दिवस दु:खी करू नये. वर्तमानातील कर्म करताना आत्मभावाने, सकारात्मकतेने केल्यास त्यातून स्वत:सह आपल्या कुटुंबाला आणि आपल्या सहवासात येणाऱ्या सर्वांना आनंदी-आनंदच मिळेल. यातूनच आनंदी समाजनिर्मिती होईल, असेही प.पू.प्रतिभाकुंवरजी म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)