सकल मराठा समाजाचा बारामतीत ठिय्या

बारामती– मराठा आरक्षणासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात आठवडाभराच्या ठिय्या आंदोलनास आज (गुरुवारी) प्रारंभ झाला. नगरपालिकेसमोर तीन हत्ती चौकात आज मराठा बांधवांनी सकाळी दहा पासूनच हजेरी लावत या आंदोलनात सहभाग नोंदविला. हे आंदोलन तालुक्‍यात रविवार (दि. 5) सोडून बुधवार (दि. 8) पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. हे आंदोलन शांततामय मार्गाने होणार असून याचा कोणालाही त्रास होणार नाही. असे आयोजकांनी सांगितले आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने बारामती शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्ता ठेवण्यात आहे. तीन हत्ती चौक ते भिगवण चौक हा मुख्य रहदारीचा रस्ता दोन्ही बाजूंनी पोलिसांनी आडवला आहे. व वाहतूकीसाठी बंदही ठेवण्यात आलेला आहे.
या आंदोलनाची आचार संहिता जाहिर करण्यात आलेली आहे. आंदोलन पूर्णपणे शांततेत केले जाईल. गावाच्या ठिकाणावरुन आंदोलन स्थळी येताना शिस्तीमध्ये यावे. स्वत:ची व इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. ठरलेल ठिकाण सोडून इतरत्र फिरु नये व अफवांवर विश्‍वास ठेवू नये. ठिया आंदोलनाच्या ठिकाणी इतर समाजबांधवांचा पाठिंबा तोडी अथवा लिखित स्वरुपात स्विकारला जाणार नाही. आंदोलनाच्या ठिकाणी एखादी संशयास्पद व्यक्ति आढळल्यास त्वरीत प्रशासनाला कळविण्यात येईल. कोणत्याही प्रकारची जातीवाचक टिपण्णी होणार नाही व आंदोलन बदनाम होणार नाही याची खबरदारी सर्वानी घेणे आवश्‍यक आहे. अशा महत्त्वपूर्ण सूचना आंदोलकांनी मोठ्या फलकाद्वारे मंडपस्थळी लावल्या आहेत.

  • या ठिकाणी होणार ठिय्या आंदोलन
    शुक्रवारी (दि. 3) : मेडद, नेपतवळण, कऱ्हावागज, भिलारवाडी, जळगाव सुपे, जळगाव कप, सायंबाची वाडी,लोणीभापकर, मासाळवाडी, तरडोली, माळवाडी, काऱ्हाटी, बाभुर्डी, शेरेवाडी, काळखैरेवाडी, पानसरेवाडी, सुपे, खंडूखैरेवाडी, भोंडवडेवाडी, कुतवळवाडी, वढाणे आंबी खुर्द, मोरगाव, जोगवडी. शनिवारी (दि. 4) : आंदोबावाडी, पाहुणेवाडी, खांडज, माळेगाव कारखाना, घोरपडे वस्ती, शिरवली, सांगवी, कांबळेश्‍वर, शिरष्णे, पिंपळेवाडी, पंधारवाडी. सोमवारी (दि. 6) : माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, पणदरे, सोनकसवाडी, ढाकाळे, पवईमाळ, मानाप्पावस्ती, धुमाळवाडी, लाटे, माळवाडी, बजरंगवाडी, मुरुम, होळ, कोऱ्हाळे, वडगाव निंबाळकर, मुढाळे, खांमगळवाडी, चौधरवाडी, होळ. मंगळवारी (दि. 7) : बऱ्हाणपूर, अंजनगाव, उंडवडी कडेपठार, सावंतवाडी, गोजूबावी, जराडवाडी, पारवडी, देऊळगाव रसाळ, शिर्सुफळ, कटफळ, वंजारवाडी, सावळ. बुधवारी (दि. 80 : गुणवडी, पिंपळी, बांदलवाडी, लिमटेक, काटेवाडी, ढेकळवाडी, कन्हेरी, झारगडवाडी, सोनगाव, डोर्लेवाडी, गोखळी, मेखळी, घाडगेवाडी.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)