सकल जैन समाजाच्या वतीने महावीरजयंती साजरी

भिगवण – जैन समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने भगवान महावीरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान महावीरांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान विविध संघटनाच्या वतीने प्रतिमा पीजन करण्यात आले. जयंती निमित्ताने विविध धार्मिक कायर्क्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भगवान महावीर जयंतीनिमित्ताने येथील जैन मंदिरापासून महावीरांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने भगवान महावीराच्या प्रतिमेचे पूजन सरपंच हेमा माडगे, उपसरपंच प्रदीप वाकसे, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शंकरराव गायकवाड, अशोक पाचांगणे, प्रशांत शेलार, गणेश राक्षे, संतोष धवडे, वंदना शेलार, रेखा पाचांगणे, अशोक रायसोनी, रवींद्र रायसोनी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. गावामधून मिरवणूक निघाल्यानंतर विविध संघटनांच्या वतीने भगवान महावीराच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करण्यात आला. अमर बौध्द चौकामध्ये संघटनेच्या वतीने दादासाहेब शेलार, संजय देहाडे, अमोल कांबळे, बाळासाहेब शेलार यांनी प्रतिमा पूजन केले, तर भिगवण पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष महेंद्र बोगावत, डॉ. जयप्रकाश खरड यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भगवान महावीर जयंती कार्यक्रमाचे नियोजन सकल जैन समाजाच्या वतीने अभयकुमार रायसोनी, विजयकुमार बोगावत, पकंज दोशी, सचिन गांधी, उमाकांत रायसोनी, सचिन बोगावत, डॉ. एल. जी. शहा, कमलेश गांधी, संतोष गांधी, गिरीष मुनोत, चेतन बोरा आदींनी केले. मिरवरणुकीच्या समारोपनंतर सचिन बोगावत व संजय रायसोनी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)