सकल जैन बांधवांची एकत्रित मिरवणूक

इंदापूर – जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जैन सर्व जैन बांधवांनी एकत्रित भगवान महावीर प्रतिमेची सवाद्य पालखी मिरवणूक काढली.

भगवान महावीर मूर्तीचा शांतिनाथ मंदिरामध्ये डॉ. सुश्रूत शहा, चंद्रशेखर दोशी, तर पार्श्वनाथ मंदिरामध्ये माजी नगरसेवक मिलींद दोशी, संदिप शहा यांच्या हस्ते विधिवत अभिषेक करण्यात आला. निखील गांधी आणि पारसमल बागरेचा यांनी सरबत वाटप केले. शिवाजी चौकात जैन महिलांचा सामूहिक दांडिया आबालवृध्दांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मुख्य बाजारपेठेत नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा, इंदापूर अर्बन सहकारी बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा, शिक्षक शफिक शेख, बालाजी कलवले, विकास घुगे तसेच जमीर शेख यांनी पालखीचे स्वागत करून भगवान महावीर यांच्या मुर्तीस अभिवादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप गारटकर यांनी जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
श्री 1008 शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरपासून पालखी मिरवणुकीची सुरुवात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा हुमड जैन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, श्री पार्श्वनाथ दिंगबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. अशोक कोठारी, विश्वस्त जीवंधर दोशी, श्री वासुपुज्य जैन श्वेतांबर मूर्तिपुजक मंदिर ट्रस्टचे नरेंद्र गांधी, पारसमल बागरेचा, भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, जैन डॉक्‍टर संघटनेचे डॉ. सागर दोशी, डॉ. ए. के. मेहता, बाहुबली गांधी, वर्धमान स्थानकवासी जैनसंप्रदायाचे जवाहर बोरा यांच्या हस्ते झाली. भगवंत पालखी उचलण्याचा मान अरूण दोशी व संजय दोशी यांना मिळाला.
वासूपुज्य मंदिर मार्गे मिरवणुकीचा समारोप श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये करण्यात आला. मिरवणूकीत निलेश मोडासे, नितीन शहा, मोहन दोशी, सुकुमार दोशी, सुनिल दोशी, महावीर शहा, अरविंद गांधी, श्रेणिक कासार, उत्कर्ष दोशी, सुनय दोशी, महेंद्र गुंदेचा, प्रकाश बलदोटा, पिंटू मेहता, सुभाष गांधी, नंदकुमार मेहता , रमेश नाझरकर, डॉ. आशिष दोभाडा सहभागी झाले होते. सुत्रसंचलन सचिन पंडित व शांतिनाथ उपाध्ये यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)