कोरेगाव भीमा-कोणाही निपराध नागरिकांवर अन्याय होणार नाही; तसेच पोलीस यंत्रणा खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहचून कु. पुजा सुरेश सकट हिच्या कुटुंबाला न्याय मिळेल, असे मत सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केले. वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) सुरेश सकट यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली. यावेळी दत्तात्रय हरगुडे, पंडीत दरेकर, सुरेश सकट, दिलीप सकट, वसंत सकट, जयदीप सकट, प्रदीप सकट, संदीप सकट, पोलीस पाटीस समीर पवार आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, अनिल कोळेकर इतर फौजफाटा तैनात होता. कांबळे म्हणाले, घटना दुर्दैवी आहे. पोलीस यंत्रणा खऱ्या गुन्हेगारपर्यंत पोचतील. सकट दापत्याला पूर्ण संरक्षण दिले जाईल, सामाजिक न्याय विभागाकडून पुनर्वसन केले जाईल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा