सकट कुटुंबीयांचे घर जाळल्याप्रकरणी दोघांना अटक

पुणे – कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीनंतर जमाव बंदीचा आदेशाचा भंग करत घराची तोडफोड करून ते जाळल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. विशेष न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांनी दोघांचीही रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

विलास वेदपाठक (60), गणेश विलास वेदपाठक (24, दोघेही रा. नरेश्‍वर वस्ती, कोरेगाव भिमा, शिरूर) अशी येरवडा कारागृहात रवानगी केलेल्या दोघांची नावे आहेत. नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कडराव दरेकर, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात, विशाल काळुराम दरेकर (पाचही रा. सणसवाडी) आणि सुभाष गणपत धावटेरा (रा. वाडेगाव फाटा, कोरेगाव भिमा, शिरूर) यांच्यावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयदीप सुरेश सकट (24, रा.कोरेगाव भिमा) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दि. 2 जानेवारी 2018 रोजी शिरूर येथील मौजे कोरेगाव भिमा येथे हा प्रकार घडला.

फिर्यादी सकट हे अनुसुचित जातीचे असून ते कोरेगाव भिमा येथे राहत असताना त्याचे घर फोडून जाळण्यात आले होते. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात 2 जानेवारी 2018 रोजी ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात दोघांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दरम्यान, दोघांनीही जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला असून त्यांच्या जामीनावर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)