संस्मरणीय ठरली सौरभ राव यांची कारकीर्द

मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण
राव यांनी फेब्रुवारी 2014 मध्ये जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर लगेचच दोन महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत मतदार यादीतून परस्पर नावे वगळल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. तसेच आंदोलनही करण्यात आले. याविषयी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकारी राव यांनी जिल्ह्यात मतदार यादी अद्यायावत करण्याची मोहीम हाती घेतली. विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव नसल्याची एकही तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आली नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत : अनेक प्रकल्प मार्गी

पुणे-पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल ठरावे असे माळीण गावचे पुनर्वसन…पुरंदर विमानतळासाठी जागा निश्‍चित ते संरक्षण खात्याची मान्यता…जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेली कामे…मतदार याद्या अद्ययावत…कॉर्पोरेट क्षेत्रासारखी देखणी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत असे प्रकल्प मावळते जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मार्गी लागले.

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात नवे विमानतळ होणार असल्याची फक्त चर्चाच होती. राव यांच्या कार्यकाळात नविन विमानतळासाठी पुरंदर येथील जागेची निवड करण्यात आली. त्यानंतर विमानतळासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. विविध संस्थांनी पुरंदर येथील जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर संरक्षण विभागाकडून पुरंदर विमानतळास मान्यता देण्यात उशीर लावला. सुमारे आठ महिन्याच्या पाठपुराव्यानंतर संरक्षण विभागाने पुरंदर विमानतळाला ग्रीन सिग्नल दिला. संरक्षण विभागाकडून मान्यता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी राव यांनी पाठपुरावा केला. पालखी मार्गाचे विस्तारीकरण, भीमाशंकर देवस्थानसाठी केलेल्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली. आदी कामे जिल्हाधिकारी राव यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली.

माळीण गावचे आदर्श पुनर्वसन
जुलै 2014 मध्ये आंबेगाव तालुक्‍यातील माळीण गावावर भूस्खलनामुळे डोंगरकडा कोसळला. त्यामध्ये 151 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमध्ये संपूर्ण गावाचे अस्तित्वच पुसून गेले. त्यानंतर प्रशासनाकडून नवीन जागेचा शोध घेऊन माळीण जवळील आमडे गावातल्या 8 एकर जागेवर या नागरिकांचे पुनर्वसन केले. या ठिकाणी सुमारे 67 घरे बांधण्यात आली. या घरांबरोबरच तलाठी कार्यालय, बसथांबा, रस्ते, शाळा आदी सुविधा ग्रामस्थांना देण्यात आल्या. या गावचे पुनर्वसन जिल्हाधिकारी राव यांनी उत्तमरित्या केले. हे काम आदर्श ठरले.

जलयुक्‍त शिवाय अभियान प्रभावी
ब्रिटीशकालीन जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत अपुरी पडत होती. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि इमारतीचे उद्‌घाटनही राव यांनी कार्यकाळात झाले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये राव यांनी चांगले काम केले. राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली. मागील वर्षी पुणे जिल्ह्याला जलयुक्त शिवार योजनेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)