संस्थागत स्वातंत्र्य चांगल्या कामगिरीमुळे मिळते- अरविंद सुब्रह्मण्यन

    रिझर्व्ह बॅंकेकडून पुढाकार घेऊन परिणामकारक कामगिरीची अपेक्षा

नवी दिल्ली -रिझर्व्ह बॅंकेला अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य केवळ नियमामुळे मिळणार नाही, तर त्यासाठी सक्रिय राहात आणि निर्णय घेण्याची आवश्‍यकता असते, असे केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंजाब नॅशनल बॅंकेतील घोटाळ्यासंदर्भात भाष्य करताना म्हटले होते की, रिझर्व्ह बॅंक मर्यादांचे ओझे घेऊन वावरत आहे. घोटाळा झाल्यास सरकारी बॅंकांवर कारवाई करण्याबाबत रिझर्व्ह बॅंकेवर मर्यादा आहेत. विविध कायद्यांमुळे कारवाई करता येणे अशक्‍य आहे, असे सांगत उर्जित पटेल यांनी हतबलता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना अरविंद सुब्रह्मण्यन यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य हे केवळ नियम करूनच मिळत नाही. किंबहुना स्वातंत्र्य हे प्रभावी निर्णयांची परंपरा आणि प्रतिष्ठेवर अवलंबून असते.

त्यामुळे तुम्ही जेव्हा रिझर्व्ह बॅंकेच्या विश्‍वासर्हतेचा दाखला देता, तेव्हा केवळ स्वातंत्र्यच अभिप्रेत नसते. तुम्ही स्वतंत्र असाल आणि एकापाठोपाठ एक चुकीचे निर्णय घेत असाल तर तुमची विश्वासर्हता कमी होऊ शकते. त्यामुळे फक्त कायदेशीर गोष्टी याच महत्त्वाच्या नसून रिझर्व्ह बॅंकेची प्रत्यक्ष कृतीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आता सुब्रह्मण्यन यांच्या विधानावर उर्जित पटेल काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रघुराम राजन यांच्या काळातही रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. रिझर्व्ह बॅंकेवर व्याजदर कमी करण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचेही अनेकदा निदर्शनास आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)