संस्कृती फौंडेशनकडून रस्त्यावर झोपणाऱ्यांना मायेची ऊब

आळंदी-येथील संस्कृती फौंडेशन हे सामाजिक बांधिलकी जपत वर्षेभर विविध उपक्रम राबवित असते. कडाक्‍याच्या थंडीत मंदीर परिसर, इंद्रायणीतिरी उघड्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या अबालवृद्ध, गोर-गरीब यांच्याजवळ रात्री अपरात्री जाऊन गरम ब्लॅन्केट अंगावर पांघरून घालून त्यांचा थंडीपासून बचाव करतात. याचबरोबर वारकरी बांधवांसाठी देखील यात्राकाळात मोफत औषधोपचार केले जातात. नुकतीच संस्कृती फौंडेशनची टीम ही विठु भेटीसाठी पंढरपूर येथे गेली असता त्याठिकाणी थंडीत कुडकुडणाऱ्या अबालवृद्ध भाविकांच्या अंगावर मायेची ऊब देणारे उबदार ब्लॅन्केट टाकून त्यांचा आत्मा शांत केला. यावेळी एम. डी. शेख ईमाम व संस्कृती फौंडेशनचे अध्यक्ष बापू चिंचकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)