संस्कृती कला दर्पणच्या पुरस्काराचे ‘नकळत सारे घडले’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

नुकत्याच झालेल्या संस्कृती कला दर्पण पुरस्कारांमध्ये स्टार प्रवाहच्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेनं सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचं नकळत सारे घडलेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. मालिकेला एकूण चार पुरस्कार मिळाल्याने सेटवर संपूर्ण टीमला चार दिवस गोडाधोडाची मेजवानी मिळाली. 

संस्कृती कला दर्पण पुरस्कारांमध्ये नकळत सारे घडलेला एकूण सहा नामांकनं मिळाली होती. त्यापैकी, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता (हरीश दुधाडे), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (नुपूर परुळेकर) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (निरंजन पत्की) हे चार पुरस्कार मिळाले. पुरस्कार मिळाल्यानंतर मालिकेची टीम पुन्हा सेटवर आली. मिळालेल्या ट्रॉफीजची प्रॉडक्शनपासून निर्मात्यांपर्यंत प्रत्येकाने पूजा केली. सेटवर केकही कापण्यात आला. त्यानंतर पुढचे चार दिवस सेटवर सेलिब्रेशन करायचं ठरलं. त्यानुसार हरीशनं मोतीचुराचे लाडू, दिग्दर्शक निरंजन पत्कींकडून केक,  निर्मात्यांकडून मिठाई आणि नुपूरकडून सेटवर आईस्क्रीम वाटण्यात आलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘मालिका सुरू होऊन सहा महिनेच झाले आहे. एवढ्या कमी कालावधीत मालिका प्रेक्षकांना आवडणं, त्यावर पुरस्काराची मोहोर उमटणं हे फार क्वचित घडतं. मात्र, हा मान नकळत सारे घडलेला मिळाला आहे. यात स्टार प्रवाहच्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर यांच्यापासून अगदी स्पॉटबॉयपर्यंत प्रत्येकाचे कष्ट, परिश्रम आहेत. या सर्वांमुळेच हे यश मिळालं आहे. या यशाचा आनंद सेटवर उत्साहात साजरा करण्यात आला,’ असं हरीशनं सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)