भोसरी – भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान आहे. शालेय जीवनात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. गुरुकुल पद्धतीने गुरुंच्या आश्रमात राहून शिक्षण घेतले जायचे. त्यामुळेच शिक्षणाची पायाभरणी शाळेतच होते, असे प्रतिपादन साध्वी उपप्रवर्तनी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी चातु:मास प्रवचनात केले.
भोसरी येथे चातु:मास महोत्सवात श्रावक-श्राविकांना मार्गदर्शनात साध्वी म्हणाल्या, शिक्षकांच्या छान-छान गोष्टींमुळेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागते. अभ्यास करा, असे कोणी सांगितले नाही, तरी शिक्षक आपल्या शैक्षणिक प्रगतीविषयी घरी माहिती देत असल्यास आपोआप मनापासून अभ्यास घडतो. आयुष्यातील संस्कार शाळेतच मिळतात. अनेक देशांमध्ये वेगवेगळे शिक्षकदिन साजरे केले जात असले तरी त्यामागील भावना एकच आहे, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)