संस्कारांच्या माध्यमातून विद्यार्थी आदर्श नागरिक होतील- ब्रिजलाल सारडा

नगर: अहमदनगर महाविद्यालयाचे प्राध्यापक स्व. हळबे यांनी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत श्रमसंस्कार शिबीराचा सर्वप्रथम उपक्रम राबविला. त्यामुळे संपूर्ण देशात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ नगरमधून झाला आहे. आपण सर्व शहरी भागात राहत असल्याने ग्रामीण भागाचे प्रश्‍न, अडचणी काय आहेत हे आपल्याला समजत नाहीत. या शिबीरातून मिळणाऱ्या शिदोरीचा जीवनभर तुम्हाला उपयोग होणार आहे. यातूनच तुम्ही उद्याचे आदर्श नागरिक व्हाल, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीरे ग्रामीण भागात होत असल्याने तुम्ही ग्रामीण भागाशी जोडले जात आहात; त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडत आहे. डोंगरगण सारख्या विकासाच्या वाटेवर असलेल्या गावात सर्व विद्यार्थ्यांनी चांगले काम केले. त्यामुळे सर्व गावकरी तूमच्या कामावर खूष आहेत. या चांगल्या श्रमाचे तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळणार आहे. हे श्रमसंस्कार शिबीर सेवाकार्य आहे. राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत पेमराज सारडा महाविद्यालय व न्यू लॉ कॉलेजच्या संयुक्त विशेष श्रमसंस्कार शिबीर नगर तालुक्‍यातील डोंगरगण येथे पार पडले. या शिबीराचा समारोप ब्रिजलाल सारडा यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्रबंधक अशोक असेरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमप्रमुख प्रा.डॉ.शैलेश निकम, प्रा.गिरिष हिरडे, प्रा. डॉ.राहुल पंडित, प्रा.स्वाती रोकडे, प्रा.पुनम वड्डेपल्ली, सारडा कॉलेजा विद्यार्थी प्रतिनिधी प्रविण वाघमोडे, लॉ कॉलेजचा विद्यार्थी प्रतिनिधी संकेत गर्जे आदिंसह श्रम संस्कार शिबीरात सहभागी झालेले विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोलतांना सरपंच कैलास पटारे म्हणाले, डोंगरगण गावाची वाटचाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गावाकडे हळूहळू करत आहे. अनेक विकास कामांचे उपक्रम विविध योजनांमधून राबवत आहोत. माझे शालेय शिक्षण हिंद सेवा मंडळाच्या शैक्षणिक संस्थांमधूनच झाले आहे. या संस्थेच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी श्रमसंस्कार शिबीरानिमित्त माझ्या गावात आल्याचा आनंद मला झाला आहे. त्यांनी सात दिवस राबविलेल्या श्रम संस्कार शिबीराच्या माध्यमातून विविध कामे करुन गावाच्या विकासाला हातभार लावला आहे. गावकर्यांशी मिळून-मिसळून विद्यार्थी राहिल्याने सर्वांनी त्यांना भरपूर सहकार्य केले आहे.

या माध्यमातून झालेल्या कामांमुळे सर्व गावकरी खूष आहेत. असेच शिबीर दरवर्षी डोंगरगणमध्ये राबवावे, अशी आग्रहाची विनंती त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. डॉ. शैलेश निकम यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती रोकडे यांनी केले तर आभार प्रा. हिरडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)