संसार वाचवण्याचा 21 वर्षे प्रयत्न केला : अरबाझ खान 

मलायका अरोरा खान आणि अर्जुन कपूर लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची बातमी नुकतीच आली होती. यावर मलायका किंवा अर्जुन कपूर यांच्याकदून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाझ खानने मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे. आदर्श नाते कोणते असते? असे विचारल्यावर आपण या प्रश्‍नाला उत्तर देण्यास पात्र नसल्याचे इमोशनल उत्तर त्याने दिले. आदर्श नाते काय असते, हे देखील आपण सांगू शकणार नाही, असे तो म्हणाला. मलायकाबरोबरचा संसार वाचवण्याचा आपण 21 वर्षे प्रयत्न करत होतो. मात्र त्यात यश आले नाही.

जगात काही लोकांना सर्व काही मिळूनही अधिक मिळण्याची हाव असते. अशांना केवल दिखावूगिरी करण्याची सवय लागलेली असते. पण ऍडजेस्टमेंट आणि कॉम्प्रमाईज करणारे लोकच आयुष्यात खूप काही कमवून जातात, असे तो म्हणाला. करिअर असो, वा वैवाहिक आयुष्य परफेक्‍ट होण्यासाठी दररोज खूप त्रास सहन करावा लागतो. तसा मीही सहन केला आहे, असे अरबाझ म्हणाला. अरबाझ आणि मलायकाचा 2017 साली घटस्फोट झाला. त्यांच्या विभक्‍त होण्यामागे अर्जुन कपूर हाच प्रमुख कारण होता, असे समजते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)