संसारी माणसाचे दुःख ‘मोदी’ यांना कसे कळणार?- अजित पवार

‘मला नाही अब्रू, तर मी कुणाला घाबरू,’ अशी आहे सरकारची स्थिती

अकोले: “मला नाही अब्रू, तर मी कुणाला घाबरू,’ अशी या सरकारची स्थिती आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या अश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन या सरकारने पूर्ण केले नाही. या सरकारवर शेतकरी, नोकरदार, तरुण, बेरोजगार, आदिवासी, नाराज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ठ केले.

नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाखांपैकी 15 रुपये आलेले नाहीत. ज्या व्यक्तीला संसारच नाही, त्यांना गॅसची किंमत दुप्पट झाल्याचे दुःख काय कळणार? असा सवाल करीत अजित पवार यांनी मोदींना लक्ष्य केले.

केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपच्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून सत्तेवर आलेले हे सरकार त्यांनाच उद्‌ध्वस्त करीत आहे. “फेकू’ व “चुनावी जुमला’ करणाऱ्या सरकारांना पायउतार करण्यासाठी जनतेने कटिबद्ध व्हावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)